Bhajan

Aarati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Aarati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

येई हो विठ्ठले माझे माउली ये Yei Ho Vitthale Maze Mauli Ye - विठोबाची आरती Vithobachi Aarati

विठोबाची आरती - येई हो विठ्ठले आरती


येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ।। धृ ।।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। १ ।।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। २ ।।

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ३ ।।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ४ ।।

 

Yei Ho Vitthale Maze Mauli Ye
Nidhalavari Kar Theuni Vat Mi Pahe ।।D।।

Aaliya Geliya Hati Dhadi Nirop
Pandharpuri Aahe Maza Mayabap ।।1।।

Pivala Pitambar Kaisa Gagani Jhalakala
Garudavari Baisoni Maza Kaivari Aala ।।2।।

Vithobache Rajya Aamha Nitya Dipvali
Vishnudas Nama Jive Bhave Ovali ।।3।।

Aso Naso Bhav Aamha Tuziya Thaya ।
Krupadrushti Pahe Maza Pandhariraya ।।4।।

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

गणपतीची आरती - दीनदयाळ गणपती स्वामी - Dindayala Ganpati Swami

गणपतीची आरती - दीनदयाळ गणपती स्वामी - Dindayala Ganpati Swami


दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।

तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥


कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा।

अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा ॥१॥दीन.


चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी।

धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥दीन.॥२॥


ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा।

अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा ॥३॥ दीन.


आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित।

शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ ॥४॥दीन.


यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर॥

तव चरणाचा सखया मजला आहे आधार ॥५॥ दीन.


Dindayala Ganpati Swami Dyavi Maj Bheti 

Tav Charananchi Sakhaya Majala Aavad Mothi॥ D.॥


Kavan Aparadh Mhanvuni Deva Kela Rusava 

Aharnishi Mi Hrudayi Tuza Karitase Dhava ॥ 1 


Chintakupi Pdlo Kon Kadhil Baheri 

Dhave Pave Sakhaya Karuna Karuni Uddhari ॥2


Aise Hote Chitti Tari Ka Prathamachi Deva 

Angikar Karuni Kela Krupecha Theva ॥३॥ 


Aata Karne Tyag Tarihi Swami Aghtit 

Sharan Aalo Maza Aata Chukvi Anarth  


Yadavsut Ha Vinvi Donhi Joduniya Kar 

Tav Charanacha Sakhaya Majala Aahe Aadhar  5॥ 


उंदरावर बैसोनी Undiravarun Baisoni

उंदरावर बैसोनी

उंदरावर बैसोनी दुडादुडां येसी । हाती मोदक लाडू घेउनिया खासी ॥ भक्तांच्या संकर्टी धावोनि पावसी ॥ दास विनवीती तुझिया चरणांसी ॥१॥

जय देव जय देव जय जय गणराया ॥ सकळ देवांआर्थी तूं देव माझा ॥धृ॥ 

भाद्रपदमासी होसी तूं भोळा ॥ आरक्त पुष्पांच्या घालुनिया माळा ॥ कपाळी लावूनि कस्तूरी टिळा ॥ तेणें तूं दिससी सुंदर सांवळा  ॥२॥ जय

 प्रदोषाचे दिवश चंद्र शापीला ॥ समय देवं मोठा आकांत केला ॥ इंदु येवोनी चरण लागला ॥ श्री रामा बहुत शाप दीधला  ॥३॥ जय

पार्वतीच्या सुता तूं ये गणनाथा ॥ नेत्र शिणले तुझी वाट पहातां ॥ किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ॥ मजला बुद्धि देई तुं गणनाथा ॥ ४ ॥ जय 

 

Undiravar Baisoni Dudaduda Yesi ॥
Hati Modak Ladu Gheuniya Khasi ॥
Bhaktanchya Sankati Dhavoni Pavasi ॥
Das Vinviti Tuziya Charnansi ॥ 1 ॥

Jay Dev Jay Dev Jay Ganaraya ॥
Sakal Devanaadhi Tuz Dev Maza ॥ D ॥

Bhadrapadmasi Tu Hosi Bhola ॥
Aarakt Pushpanchya Ghaluniya Mala ॥
Kapali Launi Kasturi Tila ॥
Tene Tu  Disasi Sundar Savala ॥

Pradoshachya Diwashi Chandra Shapila ॥
Samayi Dev Motha Aakant Kela ॥
Endra Yeoni Charni Lagala ॥
Sri Rama Baghut Shap Didhala ॥

Parvatichya Suta Tu Ye Gananatha ॥
Netra Shinale Tuziya Vat Pahata ॥
Kiti Aant Pasi Ba Vighnharta ॥
Aamha Buddhi De Tu Gananatha ॥

मंगळवार, २८ मे, २०२४

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया | Gajanana Shri Ganaraya Aadhi Vandu Tuj Moraya |

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 

Gajanana Shri Ganaraya Aadhi Vandu Tuj Moraya

गजानना श्री गणराया |
आधी वंदू तुज मोरया ||
मंगलमूर्ती श्री गणराया |
आधी वंदू तुज मोरया || धृ ||

सिंदूर चरित ढवळे अंग |
चंदन उटी खुलवी रंग ||
बघता मानस होते दंग  |
जीव जडला चरणी तुझिया || १ ||


गौरी तनया भालचंद्र |
देवा कृपेच्या तू समुद्र ||
वरद विनायक करुणा गाया  |
अवघी विघ्न नेसी विलया || २ ||


Gajanana Shri Ganaraya
Aadhi Vandu Tuj Moraya
Mangalmurti Shri Ganaraya
Aadhi Vandu Tuj Moraya

सोमवार, २७ मे, २०२४

कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करूं तुजला । Karpurgaura Gaurishankara Aarati Karun Tujala |

कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करूं तुजला ।  Karpurgaura Gaurishankara Aarati Karun Tujala |

कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करूं तुजला ।।
नाम स्मरता प्रसन्न होऊनि पावसी भक्ताला ।। धृ ।।

त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठी रुंडमाळा ।।
उग्रविषातें पिउनि रक्षिसी देवां दिक्पाळां ।।
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नि ज्वाळा ।।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ।।

ढवळानंदी वाहन शोभे अर्धांगी गौरी ।।
जटा मुकुटीं वास करीतसे गंगासुंदरी ।।
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारी ।।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ।। २।।

Karpurgaura Gaurishankara Aarati Karun Tujala ।।
Namsmarata Prasanna Houni Pavasi Bhaktala ।। D ।।

Trishul Damaru Shobhat Hasti Kanthi Rundmala ।।
Ugravishate Piuni Rakshise Devan Dikpala ।।
Trutiya Netri Nighati Krodhe Pralyagni Jwala ।।
Namiti Surmuni Tujala Aise Tu Shankar Bhola ।। 1।।

Dhavalanandi Vahan Shobhe Aardhangi Gauri ।।
Jata Mukuti Vas Karitase Gangasundari ।।
Sadaya Saguna Gaurimana Mam Sankat Vari ।।
Moreshwarsut Vasudev Tuj Smarato Aantari ।। 2 ।।

कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करूं तुजला Lyrics  
Karpurgaura Gaurishankara Aarati Karun Tujala lyrics



 

मंगळवार, ७ मे, २०२४

तू सुखकर्ता तू दुः खहर्ता Tu Sukhakarta Tu Dukhharta

तू सुखकर्ता तू दुः खहर्ता | Tu Sukhakarta Tu Dukhharta |

तू सुखकर्ता तू दुः खहर्ता विघ्‍न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया


मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक
तुझिया द्वारी आज पातलो ये इच्छित मज द्याया

तू सकलांचा भाग्य विधाता तू विद्येचा स्वामी दाता
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला

तू माता तू पिता जगी या ज्ञाता तू सर्वस्व जगी या
पामर मी स्वर उणे भासती तुझी आरती गाय

रविवार, ३१ मार्च, २०२४

देवा देवीची निरोप आरती Deva Devinchi Nirop Aarti

देवा देवीची निरोप आरती  Deva Devinchi Nirop Aarti

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥

तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥

मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥

जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥

वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची सा‌ऊली देवा दीनावरि करी ॥६॥

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

शनिवार, २३ मार्च, २०२४

सत्यनारायणाची आरती – जय जय दीनदयाळा Satyanarayanachi Aarti - Jay Jay Dindayala

सत्यनारायणाची आरती – Satyanarayanachi Aarti

Jay Jay Dindayala Satyanarayan Deva

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥धृ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥१॥ जय जय ..

शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥२॥जय जय ..

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥
स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उध्दारिले ॥३॥ जय जय ..

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥४॥ जय जय ..

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥
ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥५॥ जय जय ..

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥६॥ जय जय ..

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ।
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥७॥ जय जय ..

श्रीराम जयराम जय जय राम ShriRam Jayaram Jay Jay Ram

श्रीरामाची आरती  -Shri Ram Aarti

|| श्रीरामाची आरती ||


श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥

कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

श्री रामाची आरती - त्रिभुवनमंडितमाळ Shri Ramachi Aarati - Tribhuvanmanditmala

॥ श्री रामाची आरती ॥

श्री रामाची आरती - त्रिभुवनमंडितमाळ 

Shri Ramachi Aarati - Tribhuvanmanditmala


त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

सरस्वती माता की आरती Saraswati Mata Ki Aarti

सरस्वती माता की आरती - Saraswati Mata Ki Aarti

ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता,
सदगुण वैभवशालिनि, त्रिभुवन विख्याता ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

चंद्रवदन पदमासिनी कृति मंगलकारी,
सोहे शुभ हंस सवारी, अतुल तेज धारी ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

बाएं कर में वीणा, दाएं कर माला,
शीश मुकुटमणि सोहे, गल मोतियन माला ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

देवि शरण जो आए, उनका उद्धार किया,
बैठी मंथरा दासी, रावण संहार किया ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

विद्यादान प्रदायिनि ज्ञान-प्रकाश भरो,
मोह, अज्ञान की निरखा, जग से नाश करो ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

धूप, दीप, फल, मेवा, ओ मां स्वीकार करो,
ज्ञान-चक्षु दे माता, जग निस्तार करो ||
जय जय सरस्वती माता
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

मां सरस्वती की आरती, जो कोई जन गावै,
हितकारी सुखकारी, ज्ञान भक्ति पावै ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता,
सदगुण वैभवशालिनि, त्रिभुवन विख्याता ||
जय जय सरस्वती माता,
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता ||

गुरुवार, २१ मार्च, २०२४

विठ्ठलाची - आरती Vitthalachi Aarti येई हो विठ्ठले माझे माऊली ये Yei Ho Vitthale Maze Mauli Ye

विठ्ठलाची - आरती Vitthalachi Aarti

Yei Ho Vitthale Maze Mauli Ye

येई हो विठ्ठले माझे माउली ये ||
निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे || धृ ||

आलिया गोलिया हाती धाडी निरोप |
पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ ||

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला |
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला || २ ||

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ||
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||

असो नासो भाव आम्हा तुज्या थाया
कृपाद्रिष्टि पाहे माझा पंढरीराया || ४ ॥

बुधवार, २० मार्च, २०२४

दशावतारांची आरती – आरती सप्रेम Dashavatarachi Aarati - Aarati Saprem Jay Jay

दशावतारांची आरती – आरती सप्रेम

Dashavatarachi Aarati - Aarati Saprem Jay Jay


आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु ॥
 

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥  आरती..
 

रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥  आरती..
 

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ ३ ॥  आरती..
 

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला  ॥ ४ ॥  आरती..
 

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ ५ ॥  आरती..
 

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥  आरती..
 

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ ७ ॥  आरती.. 

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

रामदासाची आरती - Aarati Ramdasa Bhakt Virakt Esha |

रामदासाची आरती

आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा |
उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ ||

साक्षात शंकराचा | अवतार मारुती |
कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ || आरती ||


वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला |
जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ || आरती ||

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे |
कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती ||

Aarati Ramdasa Bhakt Virakt Esha |

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

तुकारामाची आरती - Aarati Tukarama Swami Sadguru Dhama |

तुकारामाची आरती

आरती तुकारामा | स्वामी सदगुरूधामा |
सच्चिदानंदमूर्ती | पाय दाखवी आम्हा || आरती || धृ ||

राघवे सागरांत | पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले || आरती || १ ||

तुकिता तुलनेसी | ब्रम्ह तुकासि आलें |
म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले || आरती || २ ||

Aarati Tukarama Swami Sadguru Dhama |

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

ज्ञानदेवाची आरती - Sant Dnyanadevachi Aarati

ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत |
मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |
हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |
नाम ठेविले ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करी |
उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो |
साम गायन करी || २ ||

प्रकट गुह्य बोले |
विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |
पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

Sant Dnyanadevachi Aarati

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

एकनाथाची आरती - Aarati Ekanatha Maharaja Samartha |

एकनाथाची आरती

आरती एकनाथा |
महाराजा समर्था |

त्रिभुवनी तूंचि थोर |
जगदगुरू जगन्नाथा || धृ ||

एकनाथ नाम सार |
वेदशास्त्रांचे गूज |
संसारदु:ख नाम |
महामंत्राचे बीज | आरती || १ ||

एकनाथ नाम घेतां |
सुख वाटले चित्ता |
अनंत गोपाळदासा |
धणी न पुरे गातां |
आरती एकनाथा |
महाराजा समर्था || २ ||

Aarati Ekanatha Maharaja Samartha |

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

श्री कृष्णाची आरती - ओवाळू आरती मदनगोपाळा | Ovalu Aarati Madangopala |

श्री कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ ||

चरणकमल ज्याचे अति सुकुमार |
ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ ||ओवाळू ||

नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान |
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन || २ || ओवाळू ||

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी |
वेधले मानस हारपली दृष्टी || ३ || ओवाळू ||

जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान |
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन || ३ || ओवाळू  ||

एका जनार्दनी देखियले रूप |
रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप || ५ || ओवाळू ||

श्री कृष्णाची आरती - ओवाळू आरती मदनगोपाळा | 

Ovalu Aarati Madangopala |

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

दुर्गेची आरती - दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | Durge Dughat Bhari Tujvin Sansari |

दुर्गेची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी |
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारी जन्ममरणाते वारी |
हरी पडलो आता संकट निवारी || १ ||
जय देवी जय देवी महिषसूरमथिनी |
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ ||

त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही |
चारी श्रमले परंतु न बोलवे काही |
साही विवाद करिता पडिले प्रवाही |
तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ ||

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा |
क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा |
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा |
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा | || ३ ||
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी |
सुरवरईश्वरवरदे तारक ||

दुर्गेची आरती 

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | 

Durge Dughat Bhari Tujvin Sansari |

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

महालक्ष्मीची आरती - जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता | Jaydevi Jaydevi Jay Lakshmimata |

महालक्ष्मीची आरती

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता |
प्रसन्न होऊनिया वर देई आता || धृ ||

विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता |
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता || १ ||

विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही |
धावसी आम्हालागी पावसी लवलाही || २ ||

त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभो  सुखशांती  |
सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती || ३ ||

वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे |
देसी दान वरदे सदैव सौख्याचे || ४ ||

यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी |
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली || ५ ||


Jaydevi Jayadevi Jay Lakshmimata |