॥ विश्वकर्मा आरती ॥
जय देव जय देव जय विश्वकर्मा
प्रभू विश्वकर्मा जय देव जय देव जय विश्वकर्मा ।।
पंच मुख शोभती तूज तेजोमया
दशहस्त आयुधे तुझे करकमला
विराट स्वरूपा विश्वपालका ।।१।।
ऋषी मुनी वर्णिती पुराण ग्रंथा
शिल्पे अपार निर्मिली ही कथा
ऐसा विराट अनंत स्वरूपा ।।२।।
मनु-मया दैवज्ञ शिल्पी त्वष्ठा
ऐसे पाच पूत्र उगम तुझे मुखद्वारा
रिद्धी, सिद्धी, सौज्ञा तुझ्या कन्या ।।३।।
विराट रूप हे श्री विश्वकर्मा
गौण मुख्य रुपे निर्मिले ब्रम्हा
चार वेद दिले स्तुति, यज्ञ, गायना ।।४।।
महिशासुर मातला पराजित देवता
महादेवे स्मरिले ऐशा या रुपा
शस्त्रे रक्षणा इंद्रादि देवा ।।५।।
सिताहरण लंका रावण निघाला
वानर सेने राम लक्ष्मण भेटला
विश्वकर्मा स्मरणे नल-नील सेतु रचिला ।।६।।
शिल्प - कश्यपसंहिता शास्त्रग्रंथा
नाना शस्त्रे निर्मिली युद्धा करीता
पाच पुत्र उभारीले मौलीश्वर मंदिरा ।।७।।
कृष्णे वधीला जरासंघाला
द्वारिका निर्मिली शंखोद्धारा
पाच पुत्र असती त्या निर्माणा ।।८।।
ऐसा विश्वकर्मा आमुचा प्रभूवरा
महादेव पार्वती तयाचा सोयरा
रिद्धी सिद्धी भार्या शोभे गणेशा ।।९।।
भेद नाही गौण मुख्य रुपा
आदि रुप श्री विश्वकर्मा देवता
आनंदे नमितो ऐशा रुपा ।।१०।।
Jay Dev Jay Dev Jay Vishvakarma
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा