देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा |
उघड दार देवा आता उघड दार देवा || धृ ||
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची |
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची |
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा || १ ||
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप |
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप |
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा || २ ||
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी |
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी |
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा || ३ ||
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी |
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी |
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा || ४ ||
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला |
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला |
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा || ५ ||
Dehachi Tijori Bhaktichach Theva
Ughad Dar Deva Aata Ughad Dar Deva
भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
Bhajan
- 1 Index (1)
- Aarati (34)
- Abhang (102)
- AmbaMata Songs (1)
- Bhairavi (5)
- Bhajan (7)
- Bhaktigite (60)
- Bhavgeete (15)
- Dattaguru Songs (13)
- Dhyanacha Abhang (1)
- Gajar (8)
- Ganapati Songs (15)
- Gaulan (22)
- Hanumant Songs (4)
- Kavvali (1)
- Mahadev Songs (7)
- Natyasangit (24)
- Other (3)
- Prarthana (13)
- Rupavali (4)
- Shrikrushna Songs (2)
- Shriram Songs (2)
- Swami Samarth Songs (1)
- Vishnudev Songs (1)
- Vitthal Songs (31)
गुरुवार, २३ मे, २०२४
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा - Dehachi Tijori Bhaktichach Theva
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा