Bhajan

गुरुवार, २३ मे, २०२४

ये र बा साईबाबा Ye Ra Ba Saibaba

ये र बा साईबाबा Ye Ra Ba Saibaba

ये र बा साईबाबा
तू ये र बा साईबाबा
हे ओव्या गाऊ कौतुके
तू ये र बा साईबाबा

चांद्रभागेला पूर आला पाणी लागलं वड्याला
आणि रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला ||१||
ये र बा ...

प्रभू रामाचा शिष्य तू अंजणीचा सुता
अरे हनुमंता उघड छाती दाखिव रामसीता ||२||
ये र बा ...

विठ्ठलाला तुळस, गणपतीला दुर्वा
आणि शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा ||३||
ये र बा ...

आई बापाला तहान लागली बाळ गेले पाण्याला
आणि दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला ||४||
ये र बा ...

 

Ye Ra Ba Saibaba
Tu Ye Ra Ba Saibaba
He Ovya Gau Kautuke
Tu Ye Ra Ba Saibaba

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा