गौळण
कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी वृंदावना ।
मुराली वाजवितो कान्हा ।।
पैल तीरी हरी वाजवी । मुरली नदी भरली यमुना ।।
कासे पितांबर कस्तुरी टिलक । कुंडल शोभे काना ।।
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ।।
नंदाच्या हरीने कौतुक केले । जाणे अंतरीच्या खुणा ।।
एका जनार्दनी मनी म्हणा । देव महात्म्य कळेना कुणा ।।
Kashi Jau Mi Vrundavana
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा