भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
गौळण
मन मोहन मुरली वाला । नंदाचा अलबेला ।।
भक्तासाठी तो जगजेठी । कुब्जेसी रत झाला ।।
विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । प्रेमानंदे ध्याला ।।
भक्ती सुखे सुखावला । एका जनार्दनी निमाला ।।
Man Mohan Muralivala
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा