गौळण
ठुमकत ठुमकत चालली डोलत | वार्याच्या तोलान ||
घागर घेऊन | निघाली पाण्या गवळण || धृ ||
हासत खुदु खुदु मोडीत डोळे | मनी आठवी कृष्णाचे चाले ||
लगबगीने प्रभात काळी | आली नंद अंगणी ||१ ||
आडवी वाट उभा शारधर | सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर ||
एका जनार्दनी जाणे | न कळे या गौळणी ||२ ||
Thumakat Thumakat Chalali Dolat
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा