Bhajan

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

Pova Ghongadi Gheun Pahi - पोवा घोंगडी घेऊन पाही ।- गौळण

 गौळण

पोवा घोंगडी घेऊन पाही । संगे गोपाळ घेऊन गाई ।।

वृंदावनी आला लवलाही । वेणू वाजविला सुस्वरें बाई ।।


उतावीळ झाल्या गौळणी । वेणू नाद पडला कानी ।।

भोवत्या पाहती अवलोकुनी ।नयनी न दिसे शारंगपाणी ।।


विसरल्या काम धंदा । सासू सासऱ्याची नाही मर्यादा ।।

कोण जाणे त्या कोण जावा नणंदा । वृत्ती वेधली परमानंदा ।।


अवघा हरवला देह भाव । पुसिला जन्म मरणाचा ठाव ।। 

वृत्ती स्वानंदे मुरली पाहावो । सेना म्हणे भाग्य उदय हो ।।

 

Pova Ghongadi Gheun Pahi - 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा