Bhajan

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

Khele Bhovara Bai Bhovara - खेळे भोवरा बाई भोवरा - गौळण

गौळण

खेळे भोवरा खेळे भोवरा खेळे भोवरा बाई भोवरा 

खेळे राधिकेचा नवरा 


माझ्या भोवऱ्याची अरी सप्त पाताळे त्यावरी 

फिरे गर गरा फिरे गर गरा फिरे गर गर गरा


भोवरा बनला  निर्गुनी  त्यावरी चंद्र सूर्य दोनी 

जाळी शंकर गवरा जाळी शंकर गवरा


एका जनार्दनी खिळीया  खेळ खेळून पाहे चेलिया 

नाद देतो हरी हरा नाद देतो हरी हरा

 

 

Khele Bhovara Bai Bhovara 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा