Bhajan

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

विष्णूची आरती - Vishnuchi Aarati

विष्णूची आरती

आवडी गंगाजळे देवा न्हाणीले |
भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले |
अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे |
जंव जंव धूप जळे |
तंव तंव देवा आवडे |
रमावल्लमदासे अहं धूप जाळिला |
एकारतीचा मग प्रारंभ केला |
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा |
समाधी लागली पाहतां मुखारविंदा |
हरीख हरीख हातो मुख पाहतां |
चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था |
सदभवालागी बहु हा देव भुकेला |
रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला |
फल तांबूल दक्षिणा अर्पीली |
तयाउपरी नीरांजने मांडिली ||

आरती आरती करू गोपाळा |
मी तू पण सांडोनी वेळोवेळा || धृ ||


पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली |
दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी |
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें |
सुरवर सकळीक तटस्थ ठेले |
देवभक्तपण न दिसे कांही |
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं || आरती ||

विष्णूची आरती

Vishnuchi Aarati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा