Bhajan

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

संतोषीमातेची प्रासादिक आरती - Santoshimatechi Aarati

संतोषीमातेची प्रासादिक आरती

जय देवी श्रीदेवी संतोषी माते |
वंदन भावे माझे तंव पद कमलाते || धृ ||

श्रीलक्ष्मीदेवी तू श्रीविष्णुपत्नी |
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ||
जननी विश्वाची तू जीवन चितशक्ती |
शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती || १ ||

भृगुवारी श्रद्धेने उपास तंव करिती |
आंबट कोणी कांही अन्न न सेविती ||
गूळचण्याचा साधा प्रसाद भक्षिती |
मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती || २ ||

जें कोणी नरनारी व्रत तंव आचरिती |
अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थिती ||
त्यांच्या हाकेला तू धावूनिया येसी |
संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी || ३ ||

विश्र्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे |
भवभय हरुनी आम्हा सदैव रक्षावे ||
मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी |
म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी || ४ ||

संतोषीमातेची आरती  

Santoshimatechi Aarati


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा