महालक्ष्मीची आरती
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता |
प्रसन्न होऊनिया वर देई आता || धृ ||
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता |
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता || १ ||
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही |
धावसी आम्हालागी पावसी लवलाही || २ ||
त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभो सुखशांती |
सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती || ३ ||
वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे |
देसी दान वरदे सदैव सौख्याचे || ४ ||
यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी |
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली || ५ ||
Jaydevi Jayadevi Jay Lakshmimata |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा