गडयानों राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं ।
नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥
खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी ।
आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥
कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी ।
कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥
आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं ।
त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥
नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं ।
पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥
भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
Bhajan
- 1 Index (1)
- Aarati (33)
- Abhang (90)
- Bhairavi (3)
- Bhajan (6)
- Bhaktigite (52)
- Dhyanacha Abhang (1)
- Gajar (8)
- Gaulan (20)
- Kavvali (1)
- Natyasangit (23)
- Other (3)
- Prarthana (10)
- Rupavali (4)
मंगळवार, २ मे, २०२३
गडयानों राजा की रे झाला - Gadyanno Raja Ki Re Jhala
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
अतिशय सुंदर
उत्तर द्याहटवा