दत्त दर्शनला जायचं नी जायचं |
आनंद पोटात माझ्या माईना || धृ ||
गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट |
या या डोळ्याची भूक काही जाईना || १ ||
रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर |
नजरेत आणि काही येईना || २ ||
नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळ |
खेळ खेळीता खेळ पुरा होईना || ३ ||
हंडी बाग पांडुरंग दत्त गारुडी भंग |
या भजनाची हौस पुरी होईना होईना || ४ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा