मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ॥१॥ देव बाजारचा
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात ॥२॥ देव बाजारचा
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ॥३॥ देव बाजारचा
देवाच देवत्व आहे ठायी – ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ॥४॥ देव बाजारचा
Mani Nahi Bhav Mhane Deva Mala Pav
Dev Ashan, Bhetaycha Nahi Re
Dev Bajarcha Bhajipala Nahi Re
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा