Bhajan

बुधवार, १५ मार्च, २०२३

गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी | Gaulani Garhane Sangati Yashodesi |

गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी |
दही दूध खाऊनिया पळुनी जातो ऋषिकेशी || धृ ||

लाडका हा कान्हा तुझा तुला गोड वाटे |
याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे || १ ||

जमवुनी गोपाळ घरा मध्ये शिरे कान्हा |
धरू जाता पळवूनी जातो हा यादवांचा राणा || २ ||

ऐसे मज याने पिसे लावीयले सांगू काही |
ऐका जनार्दनीं काया वाचा मध्ये पायी || ३ ||


Gaulani Garhane Sangati Yashodesi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा