तारी मज आता रखुमाईच्या कांता ।
पंढरीच्या नाथा मायबापा ।। धृ ।।
अनाथांचा नाथ ऐकियेले कानी ।
सनकादिक मुनी बोलताती ।। १ ।।
त्याचिया वचनाचा पावोनि विश्वास ।
धरिली तुझी कास पांडूरंगा ।। २ ।।
नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा ।
कृपाळू केशवा सांभाळावे ।। ३ ।।
।। संत लिंबाई ।।
( संत नामदेव महाराज यांच्या कन्या )