रविवार, २९ मार्च, २०२६

प्रारंभी विनंती करू गणपति Prarambhi Vinanti Karu Ganapati

प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ।।
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ।। १ ।।

मोरया मोरया गोड हे नाम तुझे ।
कृपा सागरा हेची माहेर माझे ।।
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता ।
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ।। २ ।।

गणपती म्हणे वेरण्या
दुष्टाच्या संगती न लागावे |
ज्याला मोक्षपदाची इच्छा,
त्याने सदा मला गावे ।। ३ ।।
 
देवा परमसमर्था
दिनदयाला प्रभो जगन्नाथा |
आलो शरण तुला मी,
दिन तुझ्या ठेवितो पदी माथा ।। ४ ।।
 
देवा तव सेवेचा
सदिछेचा असो मला छंद |
कि साधू संगतीचा
ह्यांतच वाटो मनास आनंद ।। ५ ।।
 
तू सागर करुणेचा देवा
तुजलाच दु:ख सांगावे ।
तुज वाचुनी इतरांशी
दिनमुख पसरोन काय मागावे ।। ६ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा