जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥धृ॥
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट ॥
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट ॥
देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर ॥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ॥१॥
ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण ॥
मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान ॥
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर ॥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ॥२॥
मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण ॥
क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण ॥
अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर ॥३॥
Jagi Jivanache Sar Ghyave Januni Satvar
Jaise Jyache Karm Taise Phal Deto Re Ishwar ॥
Jagee Jeevanache Sar Ghyave Janunee Satvar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा