शनिवार, १८ जानेवारी, २०२५

विठू माऊली तू माऊली जगाची - Vithu Mauli Tu Mauli Jagachi

विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मुर्ती विठ्ठलाची ।
विठ्ठला ऽऽऽ माय बापा ।।धृ।।

काय तुझी माया सांगू श्रीरंगा,
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा ।
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा,
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला ऽऽऽ पांडुरंगा,
अभंगाला जोड टाळ चिपळयाची ।
माऊलीत मुर्ती विठ्ठलाची ।।१।।

लेकरांची सेवा केलीस तू आई,
कस पांग फेडू कस होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही,
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई ।
विठ्ठला ऽऽऽ मायबापा,
जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची ।
माऊलीत मुर्ती विठ्ठलाची ।।२।।

Vithu Mauli Tu Mauli Jagachi,
Maulich Murti Vitthalachi ।
Vitthala ऽऽऽ May Bapa ।।D।।

Kay Tuzi Maya Sangu Shriranga,
Sansarachi Pandhari Tu Keli Panduranga ।
Dolyatun Vahe May Chandrabhaga,
Amrutachi Godi Aaj Aaliya Abhanga ।
Vitthala ऽऽऽ Panduranga,
Abhangala Jod Tal Chipalyanchi ।
Maulich Murti Vithhalachi ।।1।।

Lekaranchi Seva Kelis Tu Aai,
Kas Pang Phedu Kas Hou Utarai ।
Tuzya Upakara Jagi Tod Nahi,
Ovalin Jiv Maza Savale Vithai ।
Vitthala ऽऽऽ Mayabapa,
Janmbhari Puja Tuzya Pavalanchi ।
Maulich Murti Vitthalachi ।।२।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा