देखिले तुमचे चरण । निवांत राहिलें मन ।
कासया त्यजीन प्राण आपुलागे माये ॥धृ॥
असेन धणी वरी आपुले माहेरी ।
मग तो श्रीहरी गीती गाईनगे माये ॥१॥
सकळही गोत माझें पंढरिसी जाण ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥२॥
भावार्थ :
भक्ताला जेव्हा भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा होते आणि जर भगवंताचे दर्शन झाले नाही, तर हा जीव राहणार नाही अशा अवस्था या खऱ्या भक्ताची होते. अखेर भगवंताचे चरणकमलांचे दर्शन झाले की मन अगदी शांत व समाधानी होते.
पण जेव्हा भगवंताचे दर्शन होत नव्हते तेव्हा प्राण त्याग करावा असे भक्ताला वाटत असते पण दर्शनामुळे समाधानी व आनंदात भक्त आता विठोबाचे श्रीहरिच्या गुणगानाचे गोड गीत गात राहीन.
आता भक्तासाठी सगळे गोत्र, परिवार आणि आधार फक्त पंढरपुरातील विठोबा एवढाच आहे. यावर तुम्हाला विश्वास नसेल पण रखुमादेवीच्या पतीचा – श्रीविठ्ठलाचा – शपथ असेच आहे.
Dekhile Tumche Charan | Nivant Zale Man ||
Kasaya Tyajin Pran | Aapulage Maye ||
Asen Dhani Vari Aapule Maheri ||
Mag To Shrihari Giti Gainage Maye ||
Sakalahi Got Maze Pandharisi Jan |
Baprakhumadevivara Vitthalachi Aan ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा