Bhajan

मंगळवार, ४ जून, २०२४

तारूं लागलें बंदरीं | Taru Lagale Bhandari |

तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥धृ.॥

लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥१॥

जाला हरीनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥

तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥

भावार्थ :

विठ्ठलाचे तारू म्हणजे जहाज चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर या बंदराला लागले आहे.  हे संतांनो या येथे विठ्ठलाच्या  जहाजमध्ये परमार्थ, भक्तीच्या धनाच्या अपार , अमाप राशी आहेत त्या तुम्ही लुटा.  या जहाजाला हरिनामाचे मोठे शिड लागले आहे. येथे तुकाराम महाराज म्हणतात, या हरिनाम शीडाच्या विठ्ठलाच्या जहाजा मध्ये ओझे वाहणारा मी एक हमाल आहे.

Taru Lagale Bandari । Chadrabhagechiye Tiri ॥D॥
 

Luta Luta Santajan । Amup He Rashi Dhan ॥1॥
 

Jhala Harinamacha Tara । Sid Lagale Pharara ॥2॥
 

Tuka Javali Hamal । Bhar Chalavi Viththal ॥3॥



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा