Bhajan

शुक्रवार, ७ जून, २०२४

हे भोळ्या शंकराला He Bholya Shankara

हे भोळ्या शंकराला He Bholya Shankara
 

हे भोळ्या शंकरा
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा शंकरा
हे भोळ्या शंकरा महादेवा

गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा
लावितो भस्म कपाळा
आवड तुला ...

त्रिशूल डमरू हाती
संगे नाचे पार्वती
आवड तुला ...

भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी
कोठे दिसे ना पुजारी
आवड तुला ...

हाता मध्ये घेउन झारी
नंदयावरी करितो सवारी
आवड तुला ...

माथ्यावर चंद्राची कोर
गड्या मध्ये सर्पाची हार
आवड तुला ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा