Bhajan

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग - Tal Bole Chipalila Nach Mazyasang

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग |
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग || धृ ||

दरबारी आले रंक आणि राव |
सारे एकरूप नाही भेदभाव |
गाउ नाचु सारे हो‍उनी निःसंग || १ ||

जनसेवेपायी काया झिजवावी |
घाव सोसुनिया मने रिझवावी |
ताल देउनी हा बोलतो मृदंग || २ ||

ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई |
एक एक खांब वारकरी होई |
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग || ३ ||

Tal Bole Chipalila Nach Mazya Sang

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा