येऊनि नरदेहा विचारावे सार । धरावा पै धीर भजनामार्गी ॥ धृ ॥
चंचळ चित्तासी ठेवूनिया ठायीं । संतांचिये पायी लीन व्हावे ॥ १ ॥
भावाचा पै हात धरावा निश्चयें । तेणे भवभय देशधडी ॥ २ ॥
नामापरते जगी साधन सोपे नाही । आवडीने गाई सर्वकाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरू झाला ॥ ४ ॥
Yeuni Nardeha Vicharave Saar | Dharav Pai Dhir Bhajanmargi ||
Chanchal Chittasi Thevuniya Thayi| Santachiye Payi Lin vhave || 1 ||
Bhavacha Pai Hat Dharava Nishchye | Tene Bhavbhay Deshdhadi || 2 ||
Namaparate Jagi Sadhan Sope Nahi | Aavadine Gai Sarvkal || 3 ||
Tuka Mhane Dhanya Vansh Tya Naracha | Aisa Nishchayacha Meru Zala || 4 ||
भावार्थ :
श्री संत तुकाराम महाराज सांगतात मनुष्याने हा मानवरूपी जन्म मिळाल्यावर पहिले आपल्या जन्माचा सार नेमके काय आहे हे जाणून घ्यावे. हे आपल्याला कुठे कळेल तर ते भजन मार्गात पण या मार्गामध्ये खूप धीराने राहावं लागेल भजनाला टाळाटाळ करू नये. भजन मार्गामध्ये संतांच्या पायाशी लिन होऊन आल्यास आपल्या मनाला, चित्ताला एक ठिकाणी ठेवायला मदत होईल. आणि या भजनातं भक्ती मार्गात एकदा का भाव निर्माण झाला कि तो सोडू नये, मात्र असे केलं नाही यातून बाहेर गेलात तर मात्र मनुष्य देशोधडीला लागेल.
तुकोबा महाराज पुढे सांगतात, नामस्मरणासारखे सोपे सहज साधन या जगात कोणते नाही त्यामुळे सर्वांनी ते नियमित घावे आवडीने गुणगुणावे. अशाप्रकारे निश्चयाचा मेरू करून, या मार्गातुन जे पुढे जातात त्यांचा वंश धन्य होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा