Bhajan

गुरुवार, २१ मार्च, २०२४

वैष्णवा संगती सुख वाटे जीवा - Vaishnava Sangati Sukh Vate Jiva |

वैष्णवा संगती सुख वाटे जीवा ।
आणीक मी देवा कांहीं नेणें ॥ध्रु॥

गायें नाचें उडें आपुलिया छंदें ।
मनाच्या आनंदें आवडीनें ॥ १॥

लाज भय शंका दुराविला मान ।
न कळे साधन यापरतें ॥२॥

तुका म्हणे आतां आपुल्या सायासें ।
आम्हां जगदीशें सांभाळावें ॥३॥

 

Vaishanava Sangati Sukh Vate Jiva|
Aanik Mi Deva Kahi Nene ||

Gaye Nache Ude Aapuliya Chhande |
Manachya Aanande Aavadine ||

Laaj Bhay Shanka Duravila Maan |
Na Kale Sadhan Yaparte ||

Tuka Mhane Aata Aapula Sayase |
Aamha Jagadishe Sambhalave ||


भावार्थ :

संत तुकाराम महाराज या अभंगात सांगतात, जेव्हा मी देव वैष्णवांच्या सोबत असतो तेव्हा मला खूप आनंद होतो. मला अजून फार काही माहीत नाही, मी मुखाने हरीचे नाम गातो, हरीच्या नामस्मरणाचा मला छंद लागला आहे.  नाचतो आणि मनात आनंदाने उड्या मारतो आणि हरी नामात रंगून जातो.  पुढे ते म्हणतात आता मला लाज, भीती, शंका किंवा अपमान वाटत नाही. वैष्णव संगत असल्यावर मला दुसऱ्या कोणत्या साधनांची गरज नाही.  आता हरीने जगदीशाने आम्हाची  काळजी घ्यावी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा