Bhajan

शनिवार, २३ मार्च, २०२४

आकाशी झेप घे रे पाखरा - Aakashi Jhep Ghe Re Pakhara

आकाशी झेप घे रे पाखरा - Aakashi Jhep Ghe Re Pakhara

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा || धृ ||

तुज भवती वैभव माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलो लुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा || १ ||
सोडी सोन्याचा पिंजरा

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा जैसा उंबरा || २ ||
सोडी सोन्याचा पिंजरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने
जा ओलांडून या सरिता सागरा || ३ ||
सोडी सोन्याचा पिंजरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते,
का जीव बिचारा होई बावरा || ४ ||
सोडी सोन्याचा पिंजरा

घामातून मोती फुलले,
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा || ५ ||
सोडी सोन्याचा पिंजरा

गीतकार : जगदीश खेबुडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा