तुझें नाम गाऊं आतां ।
तुझ्या रंगीं नाचों था था ।। धृ ।।
तुझ्या नामाचा विश्वास ।
आम्हां कैंचा गर्भवास ।। १ ।।
तुझें नामीं विसर पडे ।
तरी कोटी हत्या घडे ।। २ ।।
नाम घ्या रे कोणी फुका ।
भावें सांगतसे तुका ।। ३ ।।
Tuze Nam Gau Aata।
Tuzya Rangi Nachu Tha Tha Tha ।। धृ ।।
Tuzya Namacha Vishwas ।
Aamha Kaicha Garbhavas ।। १ ।।
Tuzya Nami Visar pde ।
Tari Koti Hatya Ghade ।। २ ।।
Nam Ghya Re Koni Fuka ।
Bhave Sangatase Tuka ।। ३ ।।
भावार्थ :
या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात सांगतात की, भगवंता आम्ही तुझे नाम गाऊ आणि तुझ्या रंगात रंगून जाऊन था था नाचू म्हणजे बेभान होऊन नाचू. आम्ही आता तुझे नाम गाऊ, तुझ्या रंगात रंगून था s था ss नाचू म्हणजे नामाच्या तालावर नृत्य करू. तुझ्या नामावर आमचा विश्वास आहे, आम्हाला आता पुन्हा गर्भवास कसा मिळेल? तुझ्या नामाचा विसर पडला तर आम्हाला कोटी हत्या केल्याचं पातक घडेल. हे फुकट मिळणारं नाम घ्या असं तुकाराम महाराज प्रेमभावाने, आपुलकीने सांगत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा