Bhajan

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

मारुतीची आरती - हनुमंता आरती | Marutichi Aarati - Hanumantachi Aarati

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ||
कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी |
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ ||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता |
तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ ||

दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द |
थरथरला धरणीधर मानिला खेद |
कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद |
रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||

मारुतीची आरती

हनुमंता आरती 

Marutichi Aarati

Hanumantachi Aarati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा