तुझें म्हणवितां काय नाश झाला ।
ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥ध्रु.॥
परी तुज नाहीं आमचे उपकार ।
नामरूपा थार केलियाचे ॥१॥
समूळीं संसार केला देशधडी ।
सांडिली आवडी ममतेची ॥२॥
दंभलोभ काम क्रोध अहंकार ।
यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥
मृत्तिका पाषाण तैसें केलें धन ।
आपले ते कोण पर नेणों ॥४॥
तुका म्हणे जालों देहासी उदार ।
आणीक विचार काय तेथें ॥५॥
Tuze Mhanavita Kay Nash Zala ।
Aik Ba Vitthala Kirti Tuzi ।। D ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा