Bhajan

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

देव माझा विठू सावळा | Dev Maza Vithu Savala |

 देव माझा विठू सावळा |
माळ त्याची माझिया गळा || धृ ||

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी |
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ  || १ ||

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर |
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा || २ ||

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो |
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा || ३ ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा