तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥ध्रु॥
जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥१॥
करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥
तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं ॥३॥
ABHANG
Tuze Thor Thor | Bhakt Kariti Vicchar ||
Japtap sadhane | Maj Chintavena Mane || 1 ||
Karuna Vachane | Myan Bhakavi Tumha Dine || 2 ||
Tuka Mhane Ghei | Maze Thode Far Thai || 3 ||
परमेश्वरा देवा तुझे थोर भक्त तुमचा स्वरूपाचा विचार तुमचा जप,तप इत्यादी साधनेही ते करतात.पण माझे मन हे सगळंकरत नाही याची मला चिंता आहे म्हणून मला आता असे वाटते की मी आता तुमची दिवसोन दिवस प्रार्थना करावी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात पमेश्वरा आता जी माझ्याकडून तुझी थोडी फार सेवा होणार आहे तिचा आपण स्वीकार करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा