Bhajan

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

Jhani Drushti Lago Tuzya Sagunapanacha अभंग - झणी दृष्‍टी लागो तुझ्या सगुणपणा ।

अभंग 

झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । जेणे माझ्या मना बोध केला ॥१॥

अनंता जन्मीचें विसरलों दु:ख । पाहतां तुझें मुख पांडुरंगा ॥२॥

योगियांच्या ध्यानी ध्यातां नातुडसी । तो तूं आम्हांपाशी मागेंपुढे ॥३॥

नामा म्हणे जीवें करीने निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ॥४॥

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा