अभंग
देखोणिया पंढरपूर |जिवा आनंद अपार ||
टाळ मृदंग वाजती | राम कृष्ण उच्चारीती ||
दिंडया पतकांचा मेळा | हर्षे नाचती गोपाळ ||
चंद्रभागा उत्तम स्थान | स्नाने पतीत पावन ||
पुंडलिका लागता पाया | चुके येर झार वाया ||
पाहता विठ्ठल मूर्ती | भानुदासा विश्रांती ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा