अभंग
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥1॥
दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥2॥
नाहीं वर्णधर्मयाती। नामीं अवघींचि सरतीं ॥3॥
तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम॥4॥
भावार्थ :
हरिनाम घेण्यासाठी कोणतेही मोल द्यावे लागत नाही, नाममंत्र खोल नाही तर सुलभ आहे. राम राम असे उच्चारावे, हे केवळ दोन अक्षरांचे काम आहे. हरिनाम घेण्यासाठी उच्च जात, श्रेष्ठ वर्ण, धर्म याची आवश्यकता नाही, तेथे सर्वांना स्वातंत्र्य आहे, हरिनामाने हरीच्या ठिकाणी सर्वजण कृतार्थ होतात. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हे भेदविरहित चैतन्याचे निवासस्थान आहे. । श्री विष्णवे नमः l
Nam Gheta Na Lage Mol Nammantra Nahi Khol ॥1॥
Do Aksharanche Kam Uccharave Ram Ram ॥2॥
Nahi Varnadhramyati Nami Avaghichi Sarati ॥3॥
Tuka Mhane Naam Chaitanya Nijadham ॥4॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा