Bhajan

रविवार, २३ मार्च, २०२५

या रे या रे या रे सज्जन Ya Re Ya Re Ya Re Sajjan

 या रे या रे या रे सज्जन ।

भजन कराया भजन कराया भजन कराया ।। ध्रु ।।


तनु मन धन हे अर्पूणी सदी ।

सत्संग धराया सत्संग धराया सत्संग धराया ।। १ ।।


आदि अंती निजसुख शांती ।

एकांत वराया एकांत वराया एकांत वराया ।।२।।


विषया पिकलेती विद्या शिकलेती ।

पोट भराया पोट भराया ।। ३ ।।


जन्मा येऊनी उगेची गेलेति ।

व्यर्थ मराया व्यर्थ मराया ।। ४ ।।


रोहिरा म्हणे तुम्हां प्रति ।

मी सांगतो हेचि तराया ।। ५ ।।